नवी दिल्ली : खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांनी बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सनं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईसजेट आणि गोएअर या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करता येणार नाही. गायकवाड यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला आहे. आधी त्या कर्मचाऱ्याने माफी मागावी मग बघू असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
रवींद्र गायकवाड यांनी काल एअर इंडियाच्या एका अधिका-याला मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या कर्माचा-याला मारहणा केल्याप्रकरणी गायकवाड यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. गायकवाडांकडे बिजनेस क्लासचे तिकीट असूनही इकॉनामी क्लासमध्ये हलवल्यामुळे संतापलेल्या रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिका-याला चपलेने मारहाण केली होती. ते पुण्यावरून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने निघाले होते.
एअर इंडियाच्या कर्मचा-यांनी खासदारांना दुय्यम वागणूक दिली असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. आगोदर बोलावून बिजनेस क्लासमध्ये जागा देण्यास सांगितले परंतू एअर इंडियाच्या अधिका-याने ऐकले नसल्यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी मारहाण केली.
#WATCH: Shiv Sena MP R.Gaikwad who assaulted AI Staff says, "won't apologise,not my mistake. Vo (victim) pehle maafi mange fir dekhenge." pic.twitter.com/T8IwCaNsmO
— ANI (@ANI_news) March 24, 2017