जुन्या नोटा बदलण्याची मुदत आरबीआयने वाढवली

आरबीआयने जुन्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली आहे, जुन्या नोटा बदलण्याची मुदत १ जानेवारी २०१५ ठरवण्यात आली आहे.

Updated: Mar 3, 2014, 09:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आरबीआयने जुन्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली आहे, जुन्या नोटा बदलण्याची मुदत १ जानेवारी २०१५ ठरवण्यात आली आहे.
या आधी ही तारीख ३१ मार्च होती. नोटा बदलण्यासाठी कोणतेही शुल्क घेण्यात येऊ नये, तसेच नोटांच्या बदल्यात संपूर्ण रक्कम परतावा म्हणून देण्यात यावी, असं आरबीआयने म्हटलं आहे.
तसेच नोटा बदलतांना कोणताही त्रास ग्राहकांना होणार नाही, याची काळजी संबंधित बँकांनी घ्यावी अशी सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे.
आरबीआयने २००५ आधी छापलेल्या नोटा ३१ मार्च २०१४ नंतर परत घेण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयने म्हटलं होतं की, ज्या नोटांवर छापण्याचं वर्ष लिहलेलं नाही, त्या नोटा बँकांमधून बदलून घेण्यात याव्यात.
ज्या नोटा २००५ आधी छापण्यात आल्या आहेत, त्या चलनात फार कमी प्रमाणात असल्याने नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये कोणतीही गर्दी दिसून आलेली नाही.
ज्या नोटा २००५ आधी छापण्यात आल्या आहेत, त्या नोटांवर सुरक्षेचे निकष फार कमी असल्याने रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.