रेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!

रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत. 

Updated: Dec 23, 2015, 11:36 AM IST
रेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती! title=

नवी दिल्ली : रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत. 


रेल्वेची जाहिरात

 

यामध्ये,

कमर्शिअल अप्रेन्टिस पोस्टसाठी ७०३ जागांवर

ट्राफिक अप्रेन्टिससाठी १६४५ जागांवर

इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्कसाठी १२७ जागा

गुडस गार्डसाठी ७५९१ जागा

ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्टसाठी १२०५ जागा

सीनिअर क्लर्क कम टायपिस्टसाठी ८६९ जागा

असिस्टंट स्टेशन मास्टरसाठी ५९४२ जागा

ट्राफिक असिस्टंट पोस्टसाठी १६६ जागा

सीनियर टाइम - कीपरसाठी ४ जागांचा समावेश आहे. 

२६ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर झालेल्या नोटिफिकेशननुसार या सगळ्या पोस्टसाठी तुम्ही २६ जानेवारी २०१६ पर्यंत अप्लाय करू शकता.