www.24taas.com, झी मीडिया, श्रीनगर
कुंपनाचे शेत खात तर असेल तर करायचं काय? अशी म्हण प्रचलित आहे. हीच बाब भारतीय स्टेट बॅंकेच्याबाबतीत घडलेय. या बॅंकेच्या एटीएम मशीनसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. याच सुरक्षा रक्षकाने एटीएम मशीन तोडून २३ लाखांवर डल्ला मारला.
जम्मू कश्मीरची राजधानी श्रीनगर येथील डलगेट भागात एका सुरक्षा गार्डने भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन तोडून २३ लाख रुपए चोरून नेले. १४ ते १५ जुलैच्या रात्री सुरक्षा रक्षक सय्यद इशफाक शाह याने ही चोरी केली. याप्रकरणी सय्यद याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, सय्यद याला ताब्यात घेतले आहे. त्याला बडगाम जिल्ह्यातील बीरवाह येथील त्याच्या घरातून २१.५५ लाख रूपये जप्त करण्यात आले आहे.
ज्यावेळी बॅंक कर्मचारी एटीएम मशीनमध्ये पैसे भरत होते, त्यावेळी त्यांनी टाकलेला पासवर्ड मला समजला. त्यानंतर मी ठरवले की पैसे काढायचे, अशी माहिती सय्यदने पोलिसांना चौकशीत दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.