‘माझं आणि नरेंद्र मोदींचं स्वप्न सारखंच’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी शरूर यांनी आपलं आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचं स्वप्न एकच असल्याचं सांगत अनेकांच्या नजरा आपल्याकडे वळवल्यात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 7, 2013, 04:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इंदौर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी शरूर यांनी आपलं आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचं स्वप्न एकच असल्याचं सांगत अनेकांच्या नजरा आपल्याकडे वळवल्यात.
हे स्वप्न काय असेल बरं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर थांबा... कारण, अगोदर नरेंद्र मोदींचं स्वप्न काय होतं हे पाहुयात... नरेंद्र मोदी यांनी नुकतंच बोलताना, ‘माझं स्वप्न कधीही पंतप्रधान बनण्याचं नव्हतं’ असं वक्तव्य केलं होतं. मोदींच्या याच वक्तव्यावर निशाणा साधत आपलंही हेच स्वप्न असल्याचं शशी थरुर यांनी म्हटलंय.
‘माझंही हेच स्वप्न आहे की नरेंद्र मोदींनी कधीही पंतप्रधान बनू नये. एका पद्धतीनं बघितलं तर त्यांचं आणि माझं स्वप्न एकच आहे’ असा टोला थरुर यांनी मोदींना लगावलाय.

शिक्षक दिनानिमित्त एका विद्यार्थीनीनं पंतप्रधान पदाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं होतं. आपल्याला कधीच पंतप्रधान बनण्याची इच्छा नव्हती... जनतेनं आपल्याला २०१७ पर्यंत गुजरातच्याच जनतेचं काम करण्याचे आदेश दिलेत, असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.