भूसंपादन: दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेची हजेरी

भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांनी घेतलेल्या बैठकीला शिवसेनेनं हजेरी लावलीय. 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी वगळण्यात याव्यात, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झालेत. शिवसेनेचादेखील नव्या विधेयकातील काही तरतुदींना आक्षेप आहे. 

PTI | Updated: Jul 28, 2015, 07:23 PM IST
भूसंपादन: दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेची हजेरी  title=

नवी दिल्ली: भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांनी घेतलेल्या बैठकीला शिवसेनेनं हजेरी लावलीय. 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी वगळण्यात याव्यात, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झालेत. शिवसेनेचादेखील नव्या विधेयकातील काही तरतुदींना आक्षेप आहे. 

सध्या संयुक्त संसदीय समितीकडं असलेल्या या विधेयकात बदल सुचवण्यासाठी शिवसेनेनं या बैठकीला हजेरी लावल्याचं समजतंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ या बैठकीला हजर असल्याची माहिती मिळतेय. 

भाजपामधील धुसफूस वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं मोदी सरकारच्या भूसंपादन विधेयकाला आता एनडीएतील घटक पक्षांनी उघडपणे विरोध सुरु केल्याचं दिसतं.  

पीटीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिलीय. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनं आपल्या आक्षेपांची यादी आज संयुक्त संसदीय समितीकडं सुपुर्द केलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.