हॉस्पिटलमध्ये जखमींच्या कपाळावर लिहिलं 'भूकंप', चौकशी सुरू

निसर्गाचा मार सहन करणाऱ्या भूकंप पीडित जिथं चार दिवसांपासून भीतीचं वातावरण आहे. जगण्यासाठी धडपड सुरू आहे. तिथं बिहारच्या दरभंगा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल प्रशासनानं रुग्णांसोबत धक्कादायक वर्तणूक केलीय. 

Updated: Apr 29, 2015, 08:49 AM IST
हॉस्पिटलमध्ये जखमींच्या कपाळावर लिहिलं 'भूकंप', चौकशी सुरू title=

पाटणा: निसर्गाचा मार सहन करणाऱ्या भूकंप पीडित जिथं चार दिवसांपासून भीतीचं वातावरण आहे. जगण्यासाठी धडपड सुरू आहे. तिथं बिहारच्या दरभंगा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल प्रशासनानं रुग्णांसोबत धक्कादायक वर्तणूक केलीय. 

दरभंगा मेजिकल कॉलेज हॉस्पिलटलमध्ये भर्ती असलेल्या भूकंप पीडित रुग्णांच्या कपाळावर हॉस्पिटल प्रशासनानं 'भूकंप' लिहिलेलं स्टिकर चिटकवलंय. हॉस्पिटल प्रशासनाच्या या वागणुकीबद्दल मीडियानं माहिती देताच, त्यांनी हे स्टिकर काढून टाकले.

मात्र, यानंतर बिहारचे पशुपालन आणि दरभंगाचे पालकमंत्री बैद्यनाथ सहनी यांनी लगेच चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. 

दरम्यान, बिहारमध्ये भूकंपामुळं झालेल्या मृतांची संख्या ५८ वर पोहोचलीय. तर १८० जण जखमी झालेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.