नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर संसद सदस्यांनी देखिल टीका करण्यास सुरूवात केली आहे.परदेशात असलेला काळा पैसा विसरून जा, पण पहिल्यांदा आमच्या पंतप्रधानांना भारतात आणा, असे वक्तव्य संसद नेते सीताराम येचुरी यांनी केले आहे.
राज्यसभेमध्ये विरोधी सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावरून गोंधळ घातला. पत्रकारांशी बोलताना येचुरी म्हणाले, 'परदेशात असलेला काळा पैसा विसरून जा, पण आमच्या पंतप्रधानांना भारतात आणा. पंतप्रधान झाल्यापासून मोदी सहा दिवसांपैकी केवळ एकच दिवस भारतात राहिले आहेत.
अनेक नेते संसदेमध्ये येत सुद्धा नाहीत. पंतप्रधानांनी याचे उत्तर द्यायला हवे, असे कॉंग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.