अखेर जयललितांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, जामीन मंजूर

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि  चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना अखेर जामीन मंजूर झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी  चार दिवस आधीच दिवाळी साजरी करण्यास सुरूवात केली आहे. 

Updated: Oct 17, 2014, 03:10 PM IST
अखेर जयललितांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, जामीन मंजूर title=

नवी दिल्ली: बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि  चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना अखेर जामीन मंजूर झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी  चार दिवस आधीच दिवाळी साजरी करण्यास सुरूवात केली आहे. 

आज सुप्रीम कोर्टानं जयललितांना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी हायकोर्टानं त्यांना जामीन नाकारला होता. 

बंगळुरू विशेष कोर्टानं अण्णा द्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवत त्यांना ४ वर्षे तुरुंगावासाची तसंच १०० कोटी रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. 

याप्रकरणी जयललिता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र कोर्टानं त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर जयललिता यांनी सुप्रीम कोर्टात धाव आणि तिथं अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.