बांग्लादेश नागरिकाला ५० हजारात भारताचे नागरिकत्व

भारताचे नागरिकत्व केवळ ५० हजार रुपयांत मिळत आहे. पश्चिम बंगाल सरकारने बांग्लादेशमधून येणाऱ्यांना ५० हजारात नागरिकत्व बहाल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: Oct 16, 2014, 08:37 PM IST
बांग्लादेश नागरिकाला ५० हजारात भारताचे नागरिकत्व title=

कोलकाता : भारताचे नागरिकत्व केवळ ५० हजार रुपयांत मिळत आहे. पश्चिम बंगाल सरकारने बांग्लादेशमधून येणाऱ्यांना ५० हजारात नागरिकत्व बहाल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
 
बांग्लादेशमधून येणाऱ्या लोकांना पश्चिम बंगाल सरकार एवढी दया का दाखवत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सीमेवर कडक सुरक्षा असून सुद्धा बांग्ला नागरिकांना भारतात प्रवेश दिला जातो. या लोकांना मतदान ओळखपत्र,  रेशनकार्ड, गाडी चालक परवाना आदी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. 

सीमेवरून आलेल्या लोकांनाचे राष्ट्रीय बँकांमध्ये सहजरित्या खाते उघडले जाते. एवढेच काय, न्यायदंडाधिकारी यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्रही बनविले जाते,अशी माहिती सूत्राकडून देण्यात आली. सीमा सुरक्षादल (बीएसएफ)च्या गुप्तचर विभागाचा हवाला देऊन येत्या काही दिवसांत बांग्लादेशी नागरिकांचा बेकायदेशीररित्या प्रवेश वाढला असल्याचे  सांगण्यात आले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.