नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या ऐतिहासिक निकालाद्वारे धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या सर्वच पक्षांना जोरदार दणका दिलाय.
धर्माच्या नावानं मतं मागणं बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा आज न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठानं दिलाय. सात न्यायमूर्तींमध्ये हा निर्णय 4 विरुद्ध 3 असा बहुमातानं घेण्यात आलाय.
धर्म, जाती, वर्ण, समाज अथवा भाषेच्या आधारे कुठल्याही प्रकारे मतं मागणं बेकायदेशीर असल्याचं निर्णयात स्पष्ट करण्यात आलंय. निवडणूक प्रक्रिया ही संपूर्ण पणे धर्मनिरपेक्ष असायला हवी असं न्यायालयाचं म्हणणं आहे. धर्मास्वातंत्र्याचा राज्याच्या धर्मनिरपेक्षतेशी काहीही संबंध नसल्याचही न्यायालयानं नमूद केलंय.