'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट

'ट्रिपल तलाक' ही लग्न मोडण्याची सर्वात वाईट पद्धत असल्याचं निरीक्षण आज सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय.

Updated: May 12, 2017, 06:17 PM IST
'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट title=

नवी दिल्ली : 'ट्रिपल तलाक' ही लग्न मोडण्याची सर्वात वाईट पद्धत असल्याचं निरीक्षण आज सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर गुरुवारपासून या विषयावर सुनावणी सुरू झालीय. विभक्त होण्याच्या या पद्धतीच्या विरोधात मुस्लिमांमधलेच अनेक जण असले, तरी काही त्याला कायदेशीर मानणारेही काही जण असल्याचं कोर्टानं म्हटलंय. 

खाजगीरित्या कोर्टाची मदत करणारे माजी कायदेमंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या म्हणण्यानुसार, ट्रिपल तलाक पाप आहे... तरीही ही पद्धत अद्यापही वैध ठरवली जाते. खुर्शीद इस्लाममध्ये निकाह, मेहर आणि तलाक विषयी आपलं मत कोर्टासमोर मांडत आहेत.

कोर्टानं याविषयी कोणताही कायदा बनवू नये, मात्र इस्लाममध्ये जी योग्य पद्धत आहे ती कोर्टानं सांगावी... जेव्हा तिसऱ्यांदा 'तलाक' म्हटलं जातं तेव्हा तो परत घेतला जाऊ शकत नाहीत, परंतु, यासाठी तीन महिन्यांची वेळ असते. ट्रिपल तलाकला एक तलाक केलं तर 90 टक्के अडचणी दूर होऊ शकतात. तीन महिन्यांच्या काळात पती-पत्नीला सामंजस्यासाठी वेळही मिळायला हवा. 

दरम्यान, तीन तलाक विरोधात याचिकाकर्ता असलेल्या 'मुदादीद ए इस्लाम' या सुफीजम संघटनेनं महिलांना समान अधिकार मिळायला पाहिजे आणि तलाक पद्धतीमध्ये सुधारणा केली जावी, अशी मागणी केलीय. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या म्हणण्यानुसार, ट्रिपल तलाक केवळ घृणास्पद आहे कारण त्यामुळे महिलांना तलाकमध्ये बरोबरीचा अधिकार मिळत नाही.