www.24taas.com, झी मीडिया, गोवा
लैंगिक शोषण प्रकरणी शनिवारी रात्री अटक करण्यात आलेल्या ‘तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याला आज गोवा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
तरुण तेजपालविरुद्ध ‘तहलका’च्या एका महिला पत्रकारानं लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या तेजपालच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, गोवा कोर्टानं तेजपालला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
दरम्यान, तेजपालचा अटकपूर्व जामीन गोवा सत्र न्यायालयाने काल फेटाळला होता. जामीन फेटाळल्यानंतर क्राईम ब्रान्च ऑफिसमध्ये तेजपालला शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. यावेळी तेजपालला वकीलांशी बोलण्याची तसंच तसंच घरचं जेवण आणि कपडे वापरण्याची परवानगीही कोर्टानं दिली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.