कोलकता : इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी गुरूवारी कोलकता येथे १००० कोटी रुपयांच्या हवाला रॅकेटचा खुलासा केला आहे. या रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याचाही संबंध आहे. दाऊद हा १९९३ च्या मुंबई स्फोटांचा आरोपी आहे.
या संदर्भात प्राथमिक चौकशी असे आढळले की हा पैसा संयुक्त अरब अमीरातला पाठविण्यात येत होता. गुप्तचर संघटनानी दिलेल्या माहितीनुसार १०० कोटी रुपये यूएईमध्ये पाठवायचे होते.
अधिक वाचा : हाफिज सईद, दाऊद इब्राहीमसह मोस्ट वॉन्टेडची यादी भारत देणार अमेरिकेला
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीडी)ने गुरूवारी सकाळी टाकलेल्या छाप्यात पैशाच्या ६० बॅग पकडल्या, त्यात ७० कोटी रूपयांची कॅश होती.
मेल ऑनलाइनने दिलेल्या बातमीनुसार सूत्रांनी सांगितले की ज्या संघटनेचा पैसा पकडला त्याचे आणि दाऊदचे संबंध असल्याचे काही संकेत मिळत आहे. गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा पद्धतीने यूएई आणि साउदी अरबला पाठविण्यात येणारा पैसा हा डी-कंपनीशी संबंधीत असतो. पकडण्यात आलेली रक्कम तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून लॉटरीद्वारे जमा करण्यात आली होती. या दोन्ही राज्यातील म्होरक्यांचा अंडरवर्ल्डशी संबंधित आहेत.
अधिक वाचा : मुलगी-जावयाच्या नावावर दाऊद खेळतोय काळ्या पैशांचा खेळ?
गुप्तचर संघटनेने या प्रकरणी पाच व्यापाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. ते आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेटचे म्होरक्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.