पणजी : गोव्यातल्या धारगळ टोल नाक्यावर मारहाण आणि तोडफोड केल्याप्रकरणी सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांवर गोवा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
डिसेंबर २०१३ मधील घटनेनंतर राणे यांच्यासह इतर सहकाऱ्यांना अटक होऊन त्यांची जामिनावर सुटका झाली होती. लवकरच या प्रकरणी म्हापसा न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे.
गोव्यात धारगळ इथं राज्याबाहेरून येणाऱ्या वाहनाकडून टोल घेतला जातो. हा टोल भरण्यासाठी राणे यांची गाडी अडवल्याच्या कारणाने आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आठ सहकार्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करत नाक्याची तोडफोड केली होती.