नवी दिल्ली : दिल्लीत एक नवा फसवणुकीचा गुन्हा समोर आलाय. धनीराम मित्तल या आरोपीनं दस्ताऐवजावर खोटी सही करून न्यायाधीशपदी विराजमान झाला होता. न्यायाधीश बनून या आरोपीनं २७०० लोकांना जामीन दिला होता. मात्र या आरोपीला चोरी करताना अटक करण्यात आली आणि त्याचे हे खोटे सत्य पोलिसांसमोर उघड झाले.
दिल्ली पुलिसांनी धनीराम या ७७ वर्षीयवृद्धाला पकडेल. या वृद्धाचे अनेक कारनामे उघड झाल्याने पोलीसही हैराण झाले आहेत. धनीराम मित्तला याला २१ वेळा पोलिसांनी अटक केली होती. आता २२ व्या वेळी पंजाबी बाग पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
धनीराम हा खोट्या हुबेहुब सह्या करण्यात माहीर आहे. त्याचे अक्षरही सुवाच्छ आहे. याच्याच जोरावर तो अनेकांच्या सह्या करुन फसवणूक करीत असे. त्यांने न्यायाधीशाची खोटी सही करून तो जज झाला. न्यायालयाची सूत्रे हातात घेत तो जज बनला. त्यांने दोन महिने न्यायाधीश म्हणून काम केले. या काळात त्यांने एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल २७०० आरोपींना जामीन दिला. मात्र, याचा कोणालाही सुगावा लागला नाही.
या महाशयाने कोलकाता येथे तीन वर्षांचा हॅंड रायटींगचा कोर्स पूर्ण केला आहे. तर राजस्थानमध्ये एलएलबीचे शिक्षण घेतले. तसेच तो भारत-पाकिस्तान सीमेवरील फाजिल्का रेल्वेवर १९६८ ते १९७४ अशी सहा वर्षे रेल्वे स्टेशन मास्तरची नोकरीही केली आहे. त्याने पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
या वृद्धाला एका चोरी प्रकरणात पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याने ;पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग़ येथून एक कार चोरी केली. कार घेऊन पळताना पोलिसांना संशय आला. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि हैराण करणाऱ्या गोष्टी पुढे आल्यात. फाजिल्का रेल्वे स्टेशनवरी मास्तरची नोकरी सोडल्यानंतर वकिली सुरु केली. तीही खोट्या कागदपत्राच्या सहाय्याने. १९९२ मध्ये झज्झरमध्ये अॅडिशनल डिस्ट्रिक्ट जजचे काम सुरु केले. तो दोन महिने जज म्हणून विराजमान होता. त्यांने आपल्या न्यायाधीच्या काळात २७०० लोकांना जामीनही दिला. आता त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिहार जेलमध्ये पाठविण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.