नवी दिल्ली : दिल्लीतील एटीएममधील साडेबावीस कोटींची रक्कम लुटणाऱ्या ड्रायव्हरला अखेर जेरबंद करण्यात यश आलेय. प्रदीप शुक्ला असे या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी आहे. आरोपी ड्रायव्हरसह चोरलेली रक्कमही ताब्यात घेण्यात आलीये. ही रक्कम आरोपीने ओखला मंडी येथील एका गोदामात लपवली होती.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या रकमेमध्ये ११ हजार रुपये कमी मिळाले आहेत. चौकशीदरम्यान आरोपीने या पैशातून घड्याळ आणि काही वस्तू खरेदी केल्याचे सांगितले.
दक्षिण दिल्लीच्या गोविंदपुरी मेट्रो स्टेशनजवळ गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. त्या रात्री एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कॅश व्हॅन आली होती. यावेळी लघुशंकेसाठी कॅश व्हॅनमधील गार्डने ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र जेव्हा गार्ड गाडीतून उतरला तेव्हा ड्रायव्हर प्रदीप गाडीसह फरार झाला.
त्यानंतर गोविंदपुरी मेट्रो स्टेशनजवळच ही कॅश व्हॅन सापडली. मात्र त्या गाडीत पैसे नव्हते. अखेर तपासादरम्यान, ड्रायव्हरचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.