मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद केल्यानंतर आता आपल्या नोटा कशा बदलायच्या असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
या संदर्भात एक फॉर्म रिझर्व बँकेने जारी केला आहे. त्यात तुमच्या बँकेचे नाव , ब्राँचचे नाव, तुमचे नाव, ओळखीचा पुरावा, ओळखपत्राचा क्रमांक, नोटांचा तपशील, स्वाक्षरी, ठिकाण आणि दिनांक यात भरून द्यावी लागणार आहे