IPS अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, भाऊ आणि वडिलांनीही केला अत्याचार

शिवंगगा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपात सब इन्स्पेक्टर आणि इतर तिघांना अटक करण्यात आलीय. पीडित मुलीनं काही आयपीएस अधिकाऱ्यांनीही लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावलाय.

Updated: Oct 8, 2015, 12:01 PM IST
IPS अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, भाऊ आणि वडिलांनीही केला अत्याचार title=

शिवगंगा, तामिळनाडू: शिवंगगा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपात सब इन्स्पेक्टर आणि इतर तिघांना अटक करण्यात आलीय. पीडित मुलीनं काही आयपीएस अधिकाऱ्यांनीही लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावलाय.

पीडित मुलीच्या वकीलांनी बुधवारी कोर्टात याचिका दाखल करत प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींमध्ये एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर आणि मुलीच्या भावाचे मित्रही सहभागी आहेत.

आणखी वाचा - धक्कादायक : भावाच्या डोळ्यासमोर बहिणीचा गँगरेप

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार हे धक्कादायक प्रकरण तेव्हा उघडकीस आलं जेव्हा १७ वर्षीय पीडित मुलीनं कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर आपला जबाब नोंदवला आणि अनेक सीनिअर पोलीस अधिकाऱ्यांचं नाव घेतलं. 

हे प्रकरण ४ जूनला पुढे आलं. जेव्हा शेजारील महिलेनं चाइल्ड हेल्पलाइनकडे धाव घेतली होती. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत या मुलीवर वडील, भाऊ, नातेवाईक, मित्र, पोलीस कर्मचारी, ऑटो ड्रायव्हर एवढंच नव्हे तर बस कंडक्टरनंही तीन वर्षांपासून बलात्कार केला. पीडितेचा दोन वेळा गर्भपातही करण्यात आला. 

आणखी वाचा - सेक्स रॅकेटचा भांडाफोड, सहा तरूणी सापडल्या विवस्त्र

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.