मोदींच्या हस्ते भालचंद्र नेमाडेंचा आज होणार 'ज्ञानपीठ' देऊन सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक कोसलाकार भालंचद्र नेमाडे यांना आज 'ज्ञानपीठ' पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. संसदेतल्या बालयोगी सभागृहात संध्याकाळी ६ वाजता हा सोहळा होईल. 

Updated: Apr 25, 2015, 04:57 PM IST
मोदींच्या हस्ते भालचंद्र नेमाडेंचा आज होणार 'ज्ञानपीठ' देऊन सन्मान title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक कोसलाकार भालंचद्र नेमाडे यांना आज 'ज्ञानपीठ' पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. संसदेतल्या बालयोगी सभागृहात संध्याकाळी ६ वाजता हा सोहळा होईल. 

मुंबई विद्यापीठातून इंग्रजी साहित्याची पदवी घेतलेल्या भालचंद्र नेमाडे यांचं मराठी साहित्यात महत्त्वाचं योगदान आहे. त्यांची १९६३ साली आलेली ‘कोसला’कादंबरी विशेष गाजली. याशिवाय त्यांनी बिढार, जरीला, झूल, हिंदू-जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबऱ्या लिहिल्या. तर देखणी आणि मेलडी हे दोन काव्यसंग्रहही लिहिले. याशिवाय टीकास्वयंवर, तुकाराम, मुलाखती आणि साहित्याची भाषा हे समिक्षाग्रंथही लिहिले आहेत.

भारतीय साहित्यक्षेत्रातला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे भालचंद्र नेमाडे चौथे मराठी साहित्यिक ठरले आहेत. यापूर्वी मराठी साहित्यात १९८७ साली वि. वा. शिरवाडकर, १९७४ साली वि. स. खांडेकर यांना तर २००३ साली विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.