गुजरातच्या समुद्रात आणखी दोन संशयित बोटी घेऱ्यात

पोरबंदरच्या समुद्रात आणखी दोन संशयास्पद बोटी आढळल्यात. कोस्ट गार्डनं सध्या या दोन्ही बोटींना घेरून ठेवलंय. गुजरातच्या पोरबंदरपासून ३७५ किमी अंतरावर समुद्रात या दोन बोटी आढळल्यात. 

Updated: Jan 2, 2015, 10:34 PM IST
गुजरातच्या समुद्रात आणखी दोन संशयित बोटी घेऱ्यात title=

अहमदाबाद : पोरबंदरच्या समुद्रात आणखी दोन संशयास्पद बोटी आढळल्यात. कोस्ट गार्डनं सध्या या दोन्ही बोटींना घेरून ठेवलंय. गुजरातच्या पोरबंदरपासून ३७५ किमी अंतरावर समुद्रात या दोन बोटी आढळल्यात. 

धक्कादायक म्हणजे, भारतामध्ये पुन्हा एकदा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट होता, अशी धक्कादायक माहिती उजेडात आलीय. मात्र कोस्ट गार्डच्या सावधानतेमुळे या हल्ल्याचा कट उधळला गेला.

कराचीतल्या केतीबंदर भागातून एक मच्छिमारी बोट अरबी समुद्रात घातपाती कारवाया करण्याच्या उद्देशानं निघाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती. त्यानुसार कोस्ट गार्डच्या डोर्नियर एअरक्राफ्टनं समुद्रावर पाळत ठेवली होती. १ जानेवारीच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यापासून ३६५ किलोमीटर अंतरावर समुद्रामध्ये ही संशयास्पद पाकिस्तानी बोट आढळली. कोस्ट गार्डनं वॉर्निंग देऊन या बोटीला थांबायला सांगितलं. मात्र, ती बोट थांबली नाही. 

अखेर कोस्ट गार्डनं जवळपास तासभर बोटीचा पाठलाग केला... मात्र थोड्या वेळानं या बोटीतल्या लोकांनीच बोटीमध्ये स्फोट घडवून ती उद्धवस्त केली... या बोटीत चार लोक तसंच स्फोटके होती, असं स्पष्ट झालंय... बोटीतल्या चौघांचाही आगीत मृत्यू झाल्याचं समजतंय.. याप्रकरणी कोस्ट गार्ड अधिक चौकशी करत असून, समुद्रामधील गस्त आणखी वाढवण्यात आलीय... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.