नवी दिल्ली : गोरक्षकाच्या मुद्यावर देशात वाद सुरु असताना केंद्र सरकारनं गायींच्या सुरक्षेबाबत पावलं उचलण्यास सुरुवात केलीय.
गायींची कत्तल आणि तस्करी रोखण्यासाठी आधार प्रमाणेच विशिष्ट ओळख क्रमांक देण्याचा केंद्र सरकार विचार करतंय. भारत-बांगलादेश सीमेवर गाय संरक्षण आणि पशू तस्करी रोखण्याबाबतचा अहवाल सरकारनं सुप्रीम कोर्टात सोपवलाय.
यासाठी गृहमंत्रालयाने एक समिती स्थापन केल्याची माहिती केंद्राच्या प्रतिनिधीने कोर्टात दिलीय. आधारकार्डप्रमाणे गाय आणि वासराची ओळख पटवण्यासाठी त्यांना एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर द्यावा. त्यामुळे गायींची एकूण संख्या काय, रंग, रुप, वाण समजेल तसच यूआयडीसारख्या यंत्रणेद्वारे गायींचं निश्चित स्थान कळण्यास मदत होईल असंही कोर्टाला सांगण्यात आलंय.