महाराष्ट्राच्या राज्यपालाची मिझोरामला बदली

महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकर नारायण यांची मिझोरामला बदली करण्यात आलीय. राष्ट्रपती भवनातून शनिवारी रात्री उशीरा याबाबतची घोषणा करण्यात आलीय. गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सध्या सोपवण्यात आलाय. 

Updated: Aug 24, 2014, 09:27 AM IST
महाराष्ट्राच्या राज्यपालाची मिझोरामला बदली

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकर नारायण यांची मिझोरामला बदली करण्यात आलीय. राष्ट्रपती भवनातून शनिवारी रात्री उशीरा याबाबतची घोषणा करण्यात आलीय. गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सध्या सोपवण्यात आलाय. 

शंकरनारायण यांची राज्यपाल पदाची मुदत 2017मध्ये संपणार आहे. मिझोरामच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांना यापूर्वी केंद्र सरकारनं बडतर्फ केलं होतं. आता हा कार्यभार शंकरनारायण यांच्याकडे सोपवण्यात आलाय.

पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी आणि कमला बेनिवाल यांच्यामध्ये विरोध पाहायला मिळाला होता. कमला बेनिवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं त्यांना निलंबित करण्यात आल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून याआधीच देण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.