www.24taas.com, खंडवा
मध्यप्रदेशातल्या खंडवा जिल्ह्यात ५० आंदोलकांनी आपली जमीन आणि घरे वाचवण्यासाठी थेट पाण्यातच धरणं आंदोलन छेडलंय. या आंदोलकांचा जीव धोक्यात आलाय.
ओंकारेश्वर धरणातील पाणी दोन मीटरनं कमी करावं या मागणीसाठी गेल्या सोळा दिवसांपासून या आंदोलकांनी पाण्यात ठाण मांडून आपला प्राण पणाला लावले आहेत. यात पुऱुषांसह महिला आंदोलकांचाही समावेश आहे. सोळा दिवसांपासून पाण्यात असल्यानं त्यांची कातडी सोलून निघालीय.
शरीरावर जखमा झाल्या असून संपूर्ण शरीर गारठलंय. मात्र याची तमा न बाळगता या आंदोलकांनी सरकारकडून मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार या आंदोलकांनी केलाय.
धरणात पाण्याची वाढ झाल्यानं या शेतक-यांची संपूर्ण जमीन पाण्यात गेली असून आता घरंही पाण्यात बुडण्याचा धोका आहे. त्यामुळं हे आंदोलन सुरू आहे. मात्र १६दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशानाकडून कोणतीही दखल या आंदोलकांची घेण्यात आलेली नाही. त्यामुळं या आंदोलकांचा जीव धोक्यात आलाय.