नवी दिल्ली : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनला फाशीचं वॉरंट रोखण्यासाठी, त्याच्या वकिलांनी दाखल केलेली याचिका गुरूवारी मध्य रात्री फेटाळून लावण्यात आली.
तीन न्यायाधीश असलेल्या खंडपीठाचे अध्यक्ष दीपक मिश्रा यांनी न्यायालयाचा एका आदेशात सांगितलं, मृत्यूच्या वॉरंटवर स्थगिती आणणे, म्हणजे न्यायालयाचं हसं होईल.
या कारणावरून ही याचिका फेटाळून लावण्यात आली, सुनावणीसाठी न्यायालयाचा रूम रात्री उघडण्यात आला, गुरूवारी पहाटे 3 वाजून 20 मिनिटांनी ही सुनावणी सुरू झाली, आणि 90 मिनिटे चालली.
न्यायालयाच्या निर्णयानंतर फाशीवर स्थगिती आणण्याचा याकूबच्या वकिलांचा शेवटचा निर्णय अयशस्वी झाला. याकूबला सकाळी सात वाजता नागपूर सेन्ट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली.
या याबाबतीत असं म्हणतात की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या रात्री सर्वोच्च न्यायालयाची दारं उघडली आणि सुनावणी घेण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.