www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रसिद्ध उद्योजक अझीम प्रेमजी यांनी २०१२ ते २०१३ या आर्थिक वर्षात ८ हजार कोटी रूपये सामाजिक कामांसाठी दान केले आहेत.
हरून इंडिया नावाच्या एका संस्थेने देशातील १० सर्वात मोठ्या दानवीरांची यादी जारी केली आहे. अझीम प्रेमजी फाऊंडेशनने देशातील ग्रामीण भागातील शिक्षणासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
शिव नादर
हरून इंडियाच्या फिलान्थ्रॉपी लिस्टवर दुसऱ्या स्थानावर आहे शिव नादर, एचसीएल ग्रृपचे चेअरमन शिव नादर यांनी २०१२ ते २०१३ या आर्थिक वर्षात ३ हजार कोटी रूपये सामाजिक कार्यासाठी खर्च केले.
शिव नादर फाऊंडेशनने शिक्षण विस्ताराचं काम हाती घेतलं आहे. शिव नादर फाऊंडेशनच्या कामाचा लाभ १५ हजार विद्यार्थ्यांना झाला आहे. शिव नादर फाऊंडेशन मागील २० वर्षापासून सामाजिक कार्य करणारी संस्था आहे.
जी एम राव
जीएमआर ग्रुपचे चेअरमेन जी एम राव हे सुद्धा दानप्रिय लोकांमध्ये आहेत. राव यांनी २०१२ ते २०१३ या आर्थिक वर्षात ७४० कोटी रूपयांचं दान दिलं. शिक्षणापासून काही कारणांमुळे दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम लावण्यात आली आहे.
नंदन निलेकणी
यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआईडीएआय) चे प्रमुख नंदन एम निलेकणी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.
इन्फोसिसचे सह संस्थापक असलेल्या नंदन निलकेणी यांनी आपल्या पत्नीच्या ट्रस्टला १० कोटी रूपये दान दिले आहेत.
ही संस्था शुद्ध पाणी, पावसाच्या पाण्याचं संवर्धन आणि गरिबांसाठी पाणी उपलब्ध करण्याचं काम करते. त्यांना इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यासोबत एक नव्या फाऊंडेशनचीही स्थापना केली.
ही संस्था सामाजिक प्रश्नांवर संशोधनाचं काम करते, आणि संबंधित मुद्यांवर स्कॉलरशीप देण्याचंही कार्य करते.
रोन्नी स्क्रूवाला
या यादीत रोन्नी स्क्रूवाला पाचव्या स्थानावर आहेत, ज्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या सशक्तीकरणासाठी ४७० कोटी रूपये दान म्हणून दिले आहेत.
किरण मजूमदार
बायोकॉन लिमिटेडच्या चेअरमन किरण मजूमदार शॉ सहाव्या स्थानावर आहेत, त्यांनी आर्थिक वर्षात ३३० कोटी रूपये दान केले. शिक्षणासाठी काम करणाऱ्या धर्माथ संस्थाना ही रक्कम दिली जाते.
मायनिंग क्षेत्रातील महारथी आणि वेदांता रिसोर्सेजचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी हेल्थ केअरसाठी २९० कोटी रूपये दिले.
रतन टाटा
रतन टाटा यांनी २०१० साली सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा एज्युकेशन ऍण्ड डेव्हलपमेंट ट्रस्टने हारवर्ड बिझनेस स्कूलला २ अब्ज, ७३ कोटी ९७ लाख रूपये दान केले होते.
शोभा डेव्हलपरचे के पी एन सी मेनन यांनी या दरम्यान २७० कोटी रूपये दिले. मेनन यांनी १९७६ मध्ये सल्तनत ऑफ ओमानमध्ये इंटीरिअर डेकोरेशनच्या फर्मची स्थापना केली आणि आपलं प्रोफेशनल करिअर सुरू केलं. ते इंडिया आणि ओमानमध्ये एज्युकेशन इन्स्टीट्यूट उघडणार आहेत.
तसेच डीएलएफचे सीईओ के पी सिंग यांनी या दरम्यान २०० कोटी रूपये दान केले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.