पाणी नाही दिलं म्हणून त्यानं बायकोचा हातच कापला...

प्यायला पाणी दिलं नाही म्हणून एका नराधमाने बायकोचा हातच कापला. ही धक्कादायक घटना लखनऊ कृष्णानगरमधील रूस्तम विहार कॉलनीमध्ये घडलीय.

Updated: Jun 13, 2015, 09:16 PM IST
पाणी नाही दिलं म्हणून त्यानं बायकोचा हातच कापला... title=

लखनऊ : प्यायला पाणी दिलं नाही म्हणून एका नराधमाने बायकोचा हातच कापला. ही धक्कादायक घटना लखनऊ कृष्णानगरमधील रूस्तम विहार कॉलनीमध्ये घडलीय.

जमीर कुरेशी असं या विकृत पतीचं नाव आहे. जमीरनं केवळ पत्नी नजमावरच नाही तर मुलगी सबा आरफा आणि सून नगमा यांच्यावरही चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केलंय. 

या तिघींनाही हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. घटनेनंतर आरोपी जमीर फरार झालाय. पोलिसांना घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकूही सापडलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांसाचा व्यवसाय करणाऱ्या जमीरच्या दोन नाती आजोळी आल्या होत्या. त्या दोघी सून नगमाच्या दोन वर्षांच्या मुलीसोबत खेळत होत्या. त्यांच्यासोबत त्याची पत्नी नजमा आणि मुलगी सबाही सामील झाल्या. यादरम्यान जमीरने त्यांच्याकडे पाणी मागितले पण सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हे पाहून चिडलेल्या जमीरने तिघींवर चाकूने हल्ला चढवला ज्यात तिघीही गंभीर जखमी झाल्या तर पत्नी नजमाच्या हाताचा पंजाही कापला गेला. 

नजमाला वाचवण्याच्या प्रयत्नात सून नगमा आणि मुलगी सबाही गंभीर जखमी झाल्यात. विक्षिप्त स्वभावाच्या जमीरचे परिसरातील कुणाशीच पटत नसल्याची माहिती जमीरचा मुलगा अश्रफने पोलिसांना दिली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.