यशवंत सिन्हा यांची ‘चू…’क झाली!

बोलताना नेत्यांची जीभ घसरणं... हे तर आता नेहमीचंच झालंय... आता, या नेत्यांच्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नावाचाही समावेश झालाय.

Updated: Jul 2, 2014, 06:05 PM IST
यशवंत सिन्हा यांची ‘चू…’क झाली! title=

नवी दिल्ली : बोलताना नेत्यांची जीभ घसरणं... हे तर आता नेहमीचंच झालंय... आता, या नेत्यांच्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नावाचाही समावेश झालाय.

झारखंडचे मुख्यमंत्र्यांबद्दल यशवंत सिन्हा यांना पत्रकारांनी कोंडीत पकडलं. त्यांच्यावर विविध प्रश्नांचा भडीमार पत्रकारांकडून करण्यात आला... या सर्व प्रश्नांना काय उत्तरं द्यावीत, या विचारानंच यशवंत सिन्हा गोंधळून गेले... आणि त्यांच्या रागाच्या पाऱ्याचा कडेलोट झाला.

यशवंत सिन्हा यांचं, रागाच्या भरात आपण काय बोलतोय याचं भानचं हरपलं... ‘मीडिया तोंडात माईक खूपसून विचारतात आणि विचारतात कोण मुख्यमंत्री बनणार? कुणी चू... ही मुख्यमंत्री बनेल’... इतक्यावरच ते थांबले नाहीत तर ‘झारखंडच्या विकासाबाबत बोलणं हेच पाप आहे... केवळ राजनीतीच करायचीय’ अशी मुक्ताफळंही त्यांनी यावेळी उधळली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.