बिलासपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वादग्रस्त छायाचित्र अपलोड करणाऱया युवकाला अटक करण्यात आली आहे, फेसबुकवर बनावट खाते तयार करून वादग्रस्त फोटो या युवकाने अपलोड केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
फेसबुकवर त्याने भाजपच्या आमदाराच्या नावाने बनावट खाते उघडले होते. फेसबुकवर तो दररोज अश्लील छायाचित्रे अपलोड करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही वादग्रस्त छायाचित्र त्याने अपलोड केले होते.
पोलिस अधिकारी सत्येंद्र पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंगड येथून राजेंद्र देवांगन याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 19 सप्टेंबर 2014 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.‘
राजेंद्रकडून मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला आहे, राजेंद्रच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती, त्याला अटक करण्यात आली आहे, असेही पांडे यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.