नवी दिल्ली : झिरो बॅलन्स असलेल्या जनधन खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्याच्या तयारीमध्ये मोदी सरकार असल्याचं वृत्त डेक्कन क्रोनिकल या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर बँकांबाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. रांगामध्ये उभ्या असलेल्या नागरिकांना मोदी सरकारचा हा दिलासादायक निर्णय ठरू शकेल.
पंतप्रधानांनी जनधन योजनेची सुरुवात केल्यानंतर जवळपास 25 कोटी खाती उघडण्यात आली. यापैकी 5 कोटी 80 लाख खाती ही झिरो बॅलन्सची होती. या खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये भरायचा केंद्राचा विचार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोव्यामध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकांआधी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरू शकतो.