www.24taas.com, नवी दिल्ली
इंधन दरवाढीला देशभरात विरोध सुरू झालाय. पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर इथं जोरदार निदर्शनं सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्या गेलेल्या गुजरातमध्येही या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू झालंय.
अहमदाबादमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी दरवाढ मागे घेण्याची मागणी करत मोर्चा काढलाय. वाराणसीमध्ये दरवाढीचा निषेध करत रेलरोको करण्यात आलाय. आग्र्यामध्येही जोरदार निदर्शनं सुरू आहेत. संपूर्ण देशभरात डिझेल दरवाढ आणि गॅसची सबसिडी कमी करण्याच्या निर्णयाविरोधात वातावरण तापू लागलंय.
दरम्यान, विरोधकांनी इंधन दरवाढीबाबत आता सरकार हल्लाबोल सुरू केलाय. डिझेल आणि गॅस दरवाढीमुळं शेतकऱ्यांची होरपळ होणार असून सरकारनं भाववाढ मागे घेण्याची मागणी भाजप नेते वेंकय्या नायडू यांनी केलीय. तर सरकारनं ऐन दुष्काळात भाववाढ केल्यामुळं सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केलाय.