भारताच्या दूतावासातील एस. बालचंद्रन यांना चीनमधील काही व्यापाऱ्यांनी न्यायालयात मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेले बालचंद्रन यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शांघाय येथील वाणिज्य दूतावास कार्यालयात काम करीत असलेलेल बालचंद्रन दोघा भारतीय वंशाच्या व्यक्तींना सोडविण्यासाठी तेथील स्थानिक न्यायालयात गेले होते. कर्जाची परतफेड न केल्याने स्थानिक व्यापा-यांनी त्यांना डांबूले. हे व्यापारी एवढ्यावरच न थांबता त्यांनी जोरदार मारहाण केली. या मारहाणीत बालचंद्रन हे गंभीर जखमी झालेत.
बालचंद्रन न्यायालयातून बाहेर पडत असताना स्थानिक व्यापा-यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि दोघा भारतीयांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या मारहाणीत बालचंद्रन हे बेशुद्ध पडले. थर्टीफर्स्टला चर्चा करुन वाद सोडवण्याचा प्रयत्न झाला. परंतु गुंता न सुटल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते.