भारत ही जागतिक शक्ती - अमेरिका

भारत जगातील मोठी शक्ती असून हा देश आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावत आहे, असे मत अमेरिकी संरक्षण मंत्रालय असलेल्या पेंटागॉनने नोंदविले आहे

Updated: Jun 7, 2012, 07:48 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

भारत जगातील मोठी शक्ती असून हा देश आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावत आहे, असे मत अमेरिकी संरक्षण मंत्रालय असलेल्या पेंटागॉनने नोंदविले आहे

 

भारत एक जागतिक शक्ती असून तो चांगल्या पद्धतीने जबाबदारी निभावत असल्याचे मत अमेरिकी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कॅप्टन जॉन किर्बी यांनी म्हटले आहे.  अमेरिकी संरक्षण मंत्री लियोन पनेटा दोन दिवसांच्या भारत दौ-यावर होते.

 

 

या पार्श्वभूमीवर पेंटागॉनचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. पनेटा यांनी बुधवारी भारताचे संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅँटनी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये राजनैतिक संबंध, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या स्थितीवर चर्चा झाल्याचे मानले जाते.