सौदी अरेबियाला लादेनचे कुटुंब रवाना

Updated: Apr 27, 2012, 11:02 AM IST

www.24taas.com,इस्लामाबाद

 

पाकिस्तानने अल-कायदा दहशतवादी संघटनेचा कट्टर म्होरक्या ओसामा बिन लादेन यांच्या तीन पत्नी आणि कुटुंबातील इतर १४  सदस्यांना आज शुक्रवारी पहाटे  सौदी अरेबियाला रवाना केले. लादेन ठार केलेल्याला एक वर्ष पूर्ण  होण्याच्या आधीच पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.

 

 

लादेनला अबोटाबादमध्ये गेल्यावर्षी मे महिन्यात ठार मारल्यानंतर या सर्व जणांना पाकिस्तानी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हापासून त्यांना कोठडीत ठेवण्यात आले होते. रवानगी झालेल्या लादेनच्या तीन पत्नींमधील दोघी सौदी अरेबियाच्या आणि येमेनची नागरिक आहे. त्यामुळे यांना सौदी अरेबियाला पाठविण्यात आले आहे. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

 

लादेनची येमेनेमधील पत्नी आणि पाच मुलांना सौदी अरेबियाहून येमेनला पाठविण्यात येणार आहे. आज पहाटे यांची रवानगी करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एका बसमधून लादेनच्या कुटुंबियांना विमानतळावर आणण्यात आले. यावेळी ज्या ठिकाणी हे कुटुंब राहत होते तेथे पत्रकारांची फौज होती. मीडियामुळे सुरूवातीला बसमधून जाण्यास लादेनच्या कुटुंबियांनी नकार दिला. त्यानंतर पोलीस आणि अधिकाऱ्यांना बसच्या काचा लावून प्लास्टिकने खिडक्या छाकून घेतल्या. लादेनच्या दोघी पत्नी सौदी अरेबियाच्या तर तिसरी अमल अब्दुलफतह येमनची नागरिक आहे.