www.24taas.com,झी मीडिया, साओ पाओलो
ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. १३ वर्षांच्या मुलाने आपल्या आईवडिलांसह आजींची गोळी मारून हत्या केली. तो एवढ्यावर न थांबता तो त्यानंतर शाळेत गेला. दिवसभर शाळेत राहिल्यानंतर संध्याकाळी स्वत:वर गोळी झाडली.
या मुलाचे आई-वडील पोलीस अधिकारी होते. मारसेलो पसेगिनी असे या मुलाचे नाव आहे. शाळेत जाण्यापूर्वी त्यांने .४० कॅलिबरच्या पिस्तुलमधून आईवडिलांसह आजींवर गोळी चालविली. बंदुकीची गोळी त्यांच्या मानेवर लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेत.
या मुलाचे वडील लुईज पसेगिनी (४०) हे १९ वर्ष मिलिटरी पोलीस होते. तर आई आंद्रेइया (३०) ही १६ वर्ष मिलिटरी पोलीस म्हणून होती. वडिलांचा शव त्यांच्या अंथरूणात सापडला तर आई बेडरूममध्ये पडलेली होती.
आजी (वडिलांची आई) बेनेदीता जे ओलिवेरिया (६५) आणि आईची आई बर्नाडेट ओलिवेरा दा सिल्वा (५५) या दोघी घराच्या दुसऱ्या भागात राहत होत्या. या दोघींना त्यांच्या अंथरूणात गोळी या मुलाने मारली. या घटनेनंतर साओ पाओलोमध्ये धक्का बसला आहे.
गोळी मारून हत्या केल्यानंतर १३ वर्षांचा मारसेलो पसेगिनी हा शाळेत गेला. तो दिवसभर शाळेत होता. त्यानंतर सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांने स्वतवर गोळी झाडून आत्महत्या केली. मारसेलो हा शाळेत गेला आणि शाळेतून परत आल्याचे दृश्य शेजारील सीसीटीव्हीत कैद झाले. त्यानंतर ही बाब उघड झाली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.