स्वाजीलँडमध्ये सौंदर्य स्पर्धेत जाणाऱ्या ३८ मुलींचा मृत्यू

मोजांबिकच्या सीमेपासून जवळ असलेल्या स्वाजीलँडमध्ये शुक्रवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ३८ मुलींचा मृत्यू झालाय आणि २० मुली जखमी झाल्या. हा तरुणींनी भरलेला ट्रक राजाच्या महालात होणाऱ्या पारंपरिक समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी जात होता. या समारंभात राजा मस्वाती तृतीय या मुलींपैकी एकीला आपली पत्नी म्हणून निवडणार होते. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

Updated: Aug 30, 2015, 10:10 AM IST
स्वाजीलँडमध्ये सौंदर्य स्पर्धेत जाणाऱ्या ३८ मुलींचा मृत्यू  title=

म्बाबने: मोजांबिकच्या सीमेपासून जवळ असलेल्या स्वाजीलँडमध्ये शुक्रवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ३८ मुलींचा मृत्यू झालाय आणि २० मुली जखमी झाल्या. हा तरुणींनी भरलेला ट्रक राजाच्या महालात होणाऱ्या पारंपरिक समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी जात होता. या समारंभात राजा मस्वाती तृतीय या मुलींपैकी एकीला आपली पत्नी म्हणून निवडणार होते. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

आणखी वाचा - कार चालवताना गर्लफ्रेंडसोबत करीत होता सेक्स, आणि पुढे

मुली एका ट्रकमध्ये पारंपारिक रीड डांसमध्ये सहभागी होण्यासाठी जात होती. तेव्हा म्बाबने आणि मनजिनीदरम्यान त्यांचा ट्रक एका कारवर आदळला. स्वाजीलँड सोलडरिली नेटवर्कचे प्रवक्ता लुकी लुखेले यांनी सांगितलं, 'एकूण ३८ मुलींना मृत घोषित करण्यात आलंय, तर २० पेक्षा अधिक मुली जखमी झाल्या आहेत.'

आणखी वाचा - युट्युबने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि २.६४ कोटींचा बसला भुर्दंड

प्रवक्त्यानं सांगितलं, 'मुली मोकळ्या ट्रकमध्ये बसलेल्या होत्या. ट्रक रस्त्यात उभ्या असलेल्या कारला धकडला.'
रीड डांस समारंभ सोमवारी आयोजित करण्यात आला होता. ही एक सौंदर्य स्पर्धा होती, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या हजारो तरुणी राजवाड्यात पोहोचतात. तरुणींनी राजासमोर नृत्य केल्यानंतर त्यातील एका मुलीला राजा आपली पत्नी म्हणून निवड करतात. 

(एजंसी)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.