www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
पश्चिम पाकिस्तानात रविवारी एक धक्कादायक घटना घडली. जेव्हा आपल्या घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांचा स्फोटात मृत्यू झाला. ही मुलं हातबॉम्बसोबत खेळत असतांना ही घटना घडली.
पोलिसांनी केलेल्या सुरूवातीच्या तपासात सांगितलं हंगू जिल्ह्यातील एका घरात दोन ते सहा वयोगटातील मुलं हातबॉम्बसोबत खेळत होते. तेव्हा तिथं स्फोट झाला. या स्फोटात मुलांव्यतिरिक्त आणखी नऊ लोक जखमी झाले. जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय.
स्थानिक पोलीस अधिकारी इफ्तिखार अहेमद म्हणाले की मृतांमध्ये ५ मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. ही मुलं हातबॉम्बला बॉल समजून खेळत होते. तेव्हाच चुकून त्याची सेफ्टी पिन निघाली आणि स्फोट झाला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.