मुंबई : विमानातून प्रवास करणाऱ्या लोंकाना देखील हे माहित नसेल की विमानातून प्रवास करतांना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही तुम्हाला अशा १० हॉरेबल गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्हाला देखील माहित नसतील.
१. हे ११ मिनिटं असतात महत्त्वाचे : टेकऑफ केल्यानंतरचे ३ मिनिटं आणि लँडीगच्या आधीचे ८ मिनिटं हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. यावेळेत तुम्ही अधिक सतर्क असले पाहिजे. एका संशोधनात असं समोर आलं आहे की विमानाला होणारे अधिक अपघात हे याच वेळेत होतात.
२. लहान मुलासोबत प्रवास : तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी अनेक जण आपल्या २ वर्षाखालील मुलाला मांडीवर घेऊन प्रवास करतात. पण असा प्रवास करणे धोक्याचे असू शकते. इमरजन्सीच्या वेळेस तुमचे हात तुमच्या मुलाला सुरक्षितपण धरून ठेवण्यास समर्थ नसतात. लहान मुलांसोबत प्रवास करतांना पैशाकडे पाहू नका. लहान मुलांसाठी विमानात सोय केलेली असते. त्याचाच वापर करावा.
३. विमानातील घाण : अनेकदा प्रवाशांचं प्रमाण जास्त असल्यास विमानात साफसफाई होत नाही. साफसफाईसाठी वेळ मिळत नसल्याने तुम्हाला घाण झालेल्या विमानातूनही प्रवास करावा लागू शकतो. सीट पॉकेट नेहमी चेक करा. तुमच्या आधी प्रवास केलेल्या व्यक्तीने कदाचित टिशू पेपर तेथे टाकले असतील, त्यामुळे तुम्हाला देखील काही संसर्गजन्य गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. विमानातील ब्लँकेट्सचा वापर करतांना सुद्धा लक्षात ठेवा ती महिन्यातून पाच वेळाच धुतली जातात.
४. पायलट झोपणे : विमान प्रवासात अनेक पायलट्स हे झोपतात असं एका संशोधनात समोर आलंय. यू.के., नॉर्वे आणि स्वीडनमधील सर्वेक्षणात 43 ते 54 टक्के वैमानिक हे प्रवासादरम्यान झोपतात असं समोर आलंय.
५. ९० सेकंदात जळतं पूर्ण विमान : विमानाला जर अचानक आग लागली तर तुमच्याकडे त्यामधून निघण्यासाठी केवळ ९० सेकंद असतात. कारण अवघ्या ९० सेकंदात संपूर्ण विमानात आग पसरते.
६. आसनाच्या त्या ५ रांगा महत्त्वाच्या : इमरजन्सी एक्जिट जवळच्या आसनावर बसलेल्या प्रवाशांना इमरजन्सीच्या वेळेत लवकर बाहेर पडता येतं. जर तुम्ही त्या ५ आसनाच्या रांगेपासून लांब असाल तर लवकर बाहेर पडणं तुम्हाला कठीण होऊन जातं.
७. वादळी वारा : जेव्हा विमान वादळी वाऱ्यातून जात असतं तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. शास्त्रज्ञांच्या मते अटलांटिक महासागरावरून विमान जात असतांना त्यांना वादळी वाऱ्याचा सामना करावा लागतो. अशा वेळेस कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं. अशा वेळेत ऑक्सिजन माक्स लाऊन प्रवास करा.