www.24taas.com,वॉशिंग्टन
अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीला आज रविवारी कवायती करताना अपघात झाला. हा अपघात पाणबुडची क्रूझ जहाजाला धडक बसल्याने झाला. या अपघातात पाणबुडीच्या अणुभट्टीचे कोणतेही नुकसान झाले नाही.
फ्लोरिडाच्या किना-याजवळ अटलांटिक महासागरात अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकांचा सराव सुरू होता. त्या त अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी यूएसएस माँटपेलियर, एजिस वर्गातील क्रुझर नौका यूएसएस सॅन जेसिंक्टो आणि विमानवाहू युद्धनौका यूएसएस हॅरी एस. ट्रुमन यांचा समावेश होता.
कवायतीच्यावेळी पाणबुडी आणि क्रूझर नौकेची धडक झाली. यात क्रूझर नौकेच्या पाण्याखालील भागात असलेल्या यंत्रणेचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने पाणबुडीचे नुकसान झाले नाही. नौदलाच्या सूत्रांनुसार पाणबुडीची अणुभट्टी सुरक्षित असून कोणीही जखणी झालेला नाही.