सिरिया : सोशल मीडियावर इसिस या दहशतवादी संघटनेचा क्रुरचेहरा असलेला एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या कथित व्हीडिओत २०० सीरियन मुलांना रांगेत उभे करुन त्यांच्यावर गोळी चालवली जात आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रोल करा.)
या व्हीडिओत दहशतवादी लहान मुलांना गोळी घालताना दिसत आहेत. इसिसचा हा जिहादी प्रचार व्हीडिओ असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हीडिओ २०१४चा असल्याचे सांगितले जात आहे.
क्रुर दहशतवादी निष्पाप लहान मुलांवर गोळीबार करत आहेत. त्यांच्यावर निर्दयीपणे बंदूक रोखली आहे. यमनमधील इसिसविरोधी कार्यकर्त्यांनी हा व्हीडिओ ऑनलाईन पोस्ट केलाय. याबाबत सोशल मीडीयावरुन टीका होत आहे. या व्हीडिओतील फुटेज हे ऑगस्ट २०१४मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओ पाहा..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.