बोरियॉंग : साऊथ कोरियामध्ये दरवर्षी एक अनोखा उत्सव साजरा केला जातो. 'बोरियॉंग मड फेस्टिवल' हा सुप्रसिद्ध उत्सव सध्या तिथे मोठ्या जल्लोषात चालू आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात एक दुसऱ्याला चिखलात लोळवण्याची मज्जा घेतली जाते.
हा उत्सव राजधानी सिओलच्या दक्षिणेकडील बोरियॉंगमधील डेचियानो समुद्रकिनाऱ्यावर चालू आहे. या उत्सवात भाग घेण्यासाठी 20 ते 30 लाख पर्यटक बोरियॉंग शहरात पोहोचले आहेत.
हा उत्सव 17 जुलै ते 26 जुलै या कालावधीत होणार आहे. 1998 सालापासून या उत्सवाची सुरूवात करण्यात आली होती.
या उत्सवादरम्यान चिखलाचा पूल बनवला जातो ज्यात लोक एकदुसऱ्याला चिखलात लोळवतात तसेच चिखलात वेगवेगळे खेळही खेळतात.
या चिखलात वेगवेगळे रंग टाकून रंगपंचमी करतात. नाच-गाणे, फटाक्यांची आतिषबाजी या सगळ्याने उत्सवात अजून रंग चढतो.
या उत्सवादरम्यान वापरलेला चिखल हा त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असतो. त्याने त्वचेवर कुठलेही साइड इफेक्ट्स होत नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.