कँडी क्रश खेळतांना पकडले गेले खासदार साहेब!

ब्रिटनमध्ये संसदीय समितीच्या बैठकीदरम्यान एक खासदार आपल्या आयपॅडवर कँडी क्रश (पझल गेम) खेळतांना पकडले गेले. 

Updated: Dec 8, 2014, 06:12 PM IST
कँडी क्रश खेळतांना पकडले गेले खासदार साहेब! title=

लंडन: ब्रिटनमध्ये संसदीय समितीच्या बैठकीदरम्यान एक खासदार आपल्या आयपॅडवर कँडी क्रश (पझल गेम) खेळतांना पकडले गेले. 

‘द गार्डियन’मध्ये सोमवारी आलेल्या बातमीनुसार कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार निगेल मिल्स कार्य आणि पेन्शन समितीच्या बैठकीदरम्यान आयपॅडवर ‘कँडी क्रश सागा’ खेळतांना पकडले गेले. 

अंबर व्हॅलीमधून २०१०च्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडले गेलेले मिल्स यांनी सांगितलं की, ‘काही बैठकांमध्ये माझं लक्ष नव्हतं आणि कदाचित मी गेम खेळत होतो.’

त्यांनी सांगितलं, ‘मला असं करायला नको होतं, मात्र जर आपण बैठकीबद्दल बोलाल तर माझं संपूर्ण बैठकीकडे लक्ष होतं आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी प्रश्नही उपस्थित करत होतो, जेणेकरून पेंशनबाबत अधिक योग्य निर्णय कसा घेतला जाईल. मी प्रयत्न करील भविष्यात अशी चूक पुन्हा न करण्याचे.’ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.