सीरियामध्ये रासायनिक हल्लाचं गंभीर स्वरूप हळूहळू उघड

सीरियाच्या बशर अल असाद यांच्या फौजांनी केलेला हा हवाई हल्ला म्हणजे रासायनिक हल्लाच असल्याच्या दाव्यांनाही पुष्टी मिळते आहे.

Updated: Apr 6, 2017, 11:56 PM IST
सीरियामध्ये रासायनिक हल्लाचं गंभीर स्वरूप हळूहळू उघड title=

नवी दिल्ली : सीरियामध्ये रासायनिक हल्लाचं गंभीर स्वरूप हळूहळू उघड होऊ लागलंय. खान शेखून इथल्या अब्दुल हमीद याच्या कुटुंबातले तब्बल 25 जण या हल्ल्यात बळी  पडले आहेत. यामध्ये त्याची पत्नी आणि जुळ्या मुलांचाही बळी गेलाय. सीरियाच्या बशर अल असाद यांच्या फौजांनी केलेला हा हवाई हल्ला म्हणजे रासायनिक हल्लाच असल्याच्या दाव्यांनाही पुष्टी मिळते आहे.

टर्कीमध्ये उपचार घेत असलेल्या काही जखमींमध्ये घातक रसायनांचे अंश सापडल्याचा दावा टर्कीच्या आरोग्य मंत्रालयानं केला आहे. सीरियानं मात्र रासायनिक हल्ला झाल्याचा दावा फेटाळलाय. तर असाद यांना पाठिशी घालत असल्याच्या आरोपांमुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी संताप व्यक्त केला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्यानंतर असाद यांच्याबद्दल असलेलं मत बदलल्याचे संकेत दिले आहेत.