भारताचा कायापालट करण्यासाठी डिजीटल इंडिया महत्त्वाचं - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सिलिकॉन व्हॅलीतील टॉप आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचं साधन असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळं देशाचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर तिथं उपस्थित सीईओंनी भारताच्या डिजीटल इंडियाचं कौतुक केलं. 

Updated: Sep 27, 2015, 12:26 PM IST
भारताचा कायापालट करण्यासाठी डिजीटल इंडिया महत्त्वाचं - पंतप्रधान  title=

कॅलिफोर्निया: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सिलिकॉन व्हॅलीतील टॉप आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचं साधन असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळं देशाचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर तिथं उपस्थित सीईओंनी भारताच्या डिजीटल इंडियाचं कौतुक केलं. 

गुगलचे सीईओ सुंदर पिचाइ, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला, क्वालकॉमचे सीईओ पॉल जेकब आदी दिग्गज मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत भारताती आगामी योजनांची माहिती देत डिजीटल इंडियाचं भरभरुन कौतुक केलं आहे. 

आणखी वाचा - स्टीव्ह जॉब्स प्रेरणा घेण्यासाठी भारतात आले होते - टिम कुक

भारतातील पाच लाख गावांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणं हे आमचे उद्दीष्ट असल्याचं मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी सांगितलं. डिजीटल इंडिया आणि मेक इन इंडिया मोहीमेत हे महत्त्वाचं पाऊल ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं. 

तर क्वालकॉमचे पॉल जेकब यांनी भारतात १५० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करुन संशोधन केंद्र सुरु करणार असल्याचं जाहीर केलं. इंटरनेट क्षेत्रात भारतात वेगानं पुढं जात असल्याचं सुंदर पिचाइ यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जागतिक दृष्टीकोन आहेत, ते नक्कीच भारताची प्रतिमा बदलतील असं सांगत सिस्कॉचे जॉन चेंबर्स यांनी मोदींच्या डिजीटल इंडियाचे कौतुक केलं. 

तर फेसबुक, ट्विटर, इन्साग्रामसारख्या सोशल साईट्सनं प्रत्येकालाच रिपोर्टर केलं, असं पंतप्रधान म्हणाले. 

आणखी वाचा -  संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.