अबू धाबी : आखाती क्षेत्रातील प्रमुख देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
त्यांच्या या यात्रेदरम्यान त्यांनी भारतीय खाण्याची लज्जत चाखता यावी, यासाठी प्रसिद्ध शेफ संजीव कपूरही दुबईत आहेत. पंतप्रधान मोदी शाकाहारी आहेत आणि त्यांच्यासाठी खास शाकाहारी जेवण तयार करण्याची जबाबदारी यूएईनं संजीव कपूर यांच्यावर सोपवण्यात आली होती.
यावेळी, संजीव कपूर यांनी बनवलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद पंतप्रधानांनीही घेतला. याचे काही फोटो संजीव कपूर यांनी ट्विटरवर शेअर केलेत.
An honour and pleasure to cook for our PM Narendra Modi ji & other dignitaries
#UAE #IndianAndProud #IndianCuisine pic.twitter.com/tk9Wd0zK0d
— Sanjeev Kapoor (@SanjeevKapoor) August 16, 2015
Dishes from last night's dinner for PM Narendra Modi Ji & Crown Prince Mohammed bin Zayed bin Sultan Al Nahyan
#UAE pic.twitter.com/vYBx6vZDuI
— Sanjeev Kapoor (@SanjeevKapoor) August 17, 2015
दोन दिवसांच्या या दौऱ्यात रविवारी अबुधाबीला पोहचल्यानंतर आपल्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी जगातील तिसरी सर्वात मोठी मस्जिदला भेट दिली. त्यानंतर अबुधाबीचं गुंतवणूक प्राधिकरणाचे (आदिया) प्रमुख हामिद बिन जायेद अल नाह्यान यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या डिनर दरम्यान गुंतवणुकीच्या संधीविषयी चर्चा केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.