घटस्फोटामुळं एकानं ६ जणांना कारनं चिरडलं

चीनच्या एका दक्षिण-पूर्व शहरात आपल्या घटस्फोटामुळं चिंताग्रस्त असलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीनं विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या एका ग्रृपला आपल्या कारनं उडवलं. यात तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झालाय. तर १३ इतर लोक जखमी झाले आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 29, 2014, 08:26 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, फुझू/चीन
चीनच्या एका दक्षिण-पूर्व शहरात आपल्या घटस्फोटामुळं चिंताग्रस्त असलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीनं विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या एका ग्रृपला आपल्या कारनं उडवलं. यात तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झालाय. तर १३ इतर लोक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या फुझू शहरातील झुआंगतू गावात आरोपीनं लोकांच्या एका समूहाला कारनं उडवलं. हाँगकाँगचं वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार घटनेनंतर आरोपीनं फरार होण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला लगेच अटक करत आपल्यासोबत पोलीस स्टेशनला नेणार.
आरोपीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो सध्या घटस्फोटाच्या समस्येला तोंड देतोय. एका साक्षीदारानं सांगितलं की या व्यक्तीच्या हाती पेट्रोल आणि लायटरही होतं. स्थानिक बॉम्ब स्कोडनं ते ताब्यात घेतलं. मृत व्यक्तींमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे जे शाळेतून आपल्या घरी जात होते.
जखमींपैकी काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश होता. पोलिसांनी सांगितलं आरोपीची पत्नी त्याला घटस्फोट देणार होती त्यामुळं तो चिंताग्रस्त होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.