टोकियो : जपानला आज भूकंपाच धक्का बसला. या भूकंपाने वित्त तसेच जीवित हानी झाली नसली तरी त्सुनामीचा धोका आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
उत्तर जपानमधील होक्काईडू किनाऱ्याला आज दुपारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. भूगर्भशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, साडेबारा वाजता हा भूकंपाचा धक्का बसला.
रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.७ इतकी मोजण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्सुनामीचा धोका अल्याचा इशारा देण्यात आलाय.