ऑस्टीन : टेक्सासमध्ये राहणारी एकेकाळची सर्वात वजनदार महिलेनं आपलं रुप अशा पद्धतीनं बदललंय की तिच्या हिंमतीला खरोखरच दाद द्यायला हवी.
मायरा रोसल्स हीचं वजन एकेकाळी ४५४ किलो होतं. आता मात्र तिनं आपलं ३६३ किलो वजन घटवलंय.
काही दिवसांपूर्वीपर्यंत मायरा हिला तिची दररोजची सगळी काम तिच्या अंथरुणावरच करावी लागत होती. परंतु, २०११ नंतर तब्बल ११ सर्जरीद्वारे तीनं आपलं वजन कमी केलंय. आता मायरा वजन केवळ ९१ किलो आहे.
एव्हढं प्रचंड वजन असेल तर एखाद्या व्यक्तीची सकारात्मक मानसिकता त्याला या 'आजारातून' बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. यासाठी मायरा आपल्या एका अपघाताला धन्यवाद देतेय. तुरुंगात असलेल्या आपल्या बहिणीच्या मुलांची जबाबदारी सध्या मायरावर आहे. त्यामुळेच तिनं आपल्या शरीरावर आणि मनावर ताबा मिळवण्यात यशस्वी झालीय.
मायराच्या वजनामुळेच २०१३ साली पतीनं तिला घटस्फोट दिला होता. आता मात्र तिनं फेसबुकवर आपल्या नव्या बॉयफ्रेंडसोबत आपला फोटो पोस्ट केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.