एफबीआयचा मोस्ट वॉन्टेड अनस अल-लिबीला अटक

एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांच्या यादीतील अतिरेकी, तसेच `अल कायदा` अतिरेकी संघटनेचा प्रमुख अनस अल-लिबी याला अटक करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Updated: Oct 6, 2013, 05:41 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, त्रिपोली
एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांच्या यादीतील अतिरेकी, तसेच `अल कायदा` अतिरेकी संघटनेचा प्रमुख अनस अल-लिबी याला अटक करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अनस अल-लिबीचा पूर्व आफ्रिकेतील अमेरिकेच्या दूतावासामध्ये १९९८ मध्ये बॉम्बस्फोटात सहभाग होता.
मात्र, लिबियातील त्रिपोली येथील त्याच्या घराबाहेरून अल लिबीचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या भावाने (नबिह) केला आहे. शनिवारी तीन गाड्यांमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी अल-लिबीला वेढले आणि गाडीत डांबून नेले. अल लिबी त्यावेळी प्रार्थना करून येत होता.
ही घटना घडल्याचे अल-लिबीच्या पत्नीने पाहिले असून ते अपहरणकर्ते अमेरिकेचे लष्कर अधिकारी असल्याचे तिने सांगितले आहे. २०११ मध्ये लिबियात झालेल्या यादवीत हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांना पदावरून निष्कासित करण्यात आल्यानंतर नझीह अब्दुल हमेद अल-रुकाई उर्फ अल लिबी हा पुन्हा लीबियात परतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अल लिबीवर पन्नास लाख डॉलर्सचे बक्षिस ठेवण्यात आले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.