भारताविरूद्ध कुरापती, पाकिस्तानचा गोळीबार

पाकिस्तानने कुरापती काढणे सुरूच ठेवले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी रविवारी दोनदा शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय चौक्यांववर गोळीबार केला. त्यामुळे तणावाचे वातावरण आहे. दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसविण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय आहे. यामुळे सोमवारी दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरची पूँच विभागात बैठक होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 14, 2013, 09:07 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
पाकिस्तानने कुरापती काढणे सुरूच ठेवले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी रविवारी दोनदा शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय चौक्यांववर गोळीबार केला. त्यामुळे तणावाचे वातावरण आहे. दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसविण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय आहे. यामुळे सोमवारी दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरची पूँच विभागात बैठक होणार आहे.
पाकिस्तानने रविवारी प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील नानगितिक्री भागातील ठाण्यावर दुपारी गोळीबार केला. त्यापूर्वी पहाटेही पूँच भागातील कृष्णाघाटी येथील ठाण्यांवर हल्ला केला करण्यात आल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
शनिवारी रात्री पाकिस्तानी सीमेवर सात जणांच्या संशयास्पद हालचाली दिसत होत्या. भारतीय जवानांनी गोळीबार केला. त्यानंतर पाकिस्तानकडूनही जोरदार गोळीबार सुरू झाला. सुमारे अर्धातास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. त्यानंतर संशयास्पद व्यक्तींनी माघार घेतल्याची माहिती लष्कराचे जनसंपर्क अधिकारी कर्नल आर. के. पल्टा यांनी दिली.
‘चाकन-दा-बघ` येथे सोमवारी दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरची बैठक होणार आहे. पाकिस्तानी सैनिकांनी आठ जानेवारी रोजी केलेल्या हल्ल्यात दोन जवानांचा मृत्यू झाला होता. हुतात्मा हेमराज सिंह यांचे शीर पाकिस्तानी सैनिक घेऊन गेले आहेत.
या बैठकीत प्रामुख्याने हेमराज यांचे शीर परत करण्याचा आग्रह भारताकडून केला जाण्याची शक्यता आहे. बैठकीसाठी ११ जानेवारीला भारताने ‘हॉटलाइन`वरून पाकिस्तानला संदेश पाठविला होता. त्यामुळे या बैठकीला महत्व आहे.